जामिनावर बाहेर असलेल्यांनी मला सर्टिफिकेट देऊ नये : नरेंद्र मोदी

पंतप्रधानांचा राहुल व सोनिया गांधींवर घणाघात 

बिलासपूर (छत्तीसगड) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगड मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी बिलासपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये राहुल व सोनिया गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली. काँग्रेस पक्षाचे राजकारण हे केवळ एका ‘कुटुंबापुरते’ मर्यादित असल्याचा आरोप मोदींनी केला. काँग्रेसच्या काळात देशाचा विकास ज्या गतीने झाला, त्याच्या कितीतरी पट अधिक वेगाने भाजपा सरकार काम करत असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी बोलताना केला.

-Ads-

विरोधकांद्वारे नोटाबंदी विरोधात सुरु असलेल्या टीकेचा देखील मोदींनी खरपूस समाचार घेतला. राहुल व सोनिया गांधी यांना उद्देशून  “याच नोटबंदीमुळे ‘या’ लोकांवर जामिनावर सुटण्याची नामुष्की ओढावली आहे, हे विसरून त्यांनी मोदीला सर्टिफिकेट देऊ नये.” अशी टीका केली.

छत्तीसगड निवडणुकांसाठी काँग्रेसने तयार केलेल्या जाहीरनाम्यावर टीका करताना मोदी म्हंटले की, ‘काँग्रेसच्या जाहीनाम्यात १५० वेळा राहुल गांधींचा उल्लेख ‘सर’ म्हणून करण्यात आला असून याद्वारे काँग्रेससाठी छत्तीसगडची जनता नाही तर राहुल महत्वाचे आहेत हे स्पष्ट होते.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)