पीएमपीचे बस थांबे झाले सुरक्षित!

जंगली महाराज रस्त्यावर स्वतंत्र बॅरिकेडिंग 
पुणे – जंगली महाराज रस्त्यावरील पीएमपी बसस्थांब्यांसाठी रस्त्यावर स्वतंत्र बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर बस थांबण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध झाली असून प्रवाशांसाठीही चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.

महापालिकेच्या स्मार्ट स्ट्रीट उपक्रमाअंतर्गत जंगली महाराज रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. या मार्गावर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहापासून डेक्कन बस थांब्यापर्यंत चार बस थांबे आहेत. ते रस्त्याकडेला असल्याने प्रवासी रस्त्यावरच उभे राहतात. तसेच इतर खासगी वाहनेही अनेकदा बसथांब्याच्या अलिकडेच रस्त्यावर उभे राहतात. त्यामुळे बहुतांश वेळा या बसेस रस्त्याच्या मधोमध प्रवासी घेण्यासाठी उभ्या राहतात. तर प्रवासीही बसथांब्यासाठी प्रशस्त जागा दिलेली असताना, बस रस्त्याच्या मध्येच थांबत असल्याने रस्त्यावरच उभे राहतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढलेले होते.

ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन तसेच पीएमपीने या चारही बसथांब्यांच्या समोरील बाजूस बस उभी राहू शकेल तेवढ्या जागेत बॅरिकेडिंग केले आहे. त्यामुळे, या बॅरिकेडिंगमधून केवळ पीएमपी बसच जात असून त्या थांब्यांवर व्यवस्थित उभ्या राहत आहेत. त्यामुळे प्रवाशांनाही सुरक्षितपणे बसथांब्यावर उभे राहणे शक्‍य होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)