अवनीच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका 

एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी 

मुंबई: अवनी टी-1 वाघिणीची वनविभागाकडून बेछुट गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्येनंतर राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. याच पार्श्‍वभूमीवर गेल्या दहा वर्षांत वन्य प्राण्यांच्या झालेल्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच वन्यजीव संवर्धन कायद्याची अंमलबजावणीही योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

-Ads-

सामाजिक कार्यकर्ता नितीन देशपांडे यांनी ऍडव्होकेट सुजय कांटावाला आणि ऍडव्होकेट आशिष मेहता यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने दखल घेऊन याचिकेची सुनावणी 12 डिसेंबरला घेण्याचे निश्‍चित केले आहे.

सातत्याने वाढती लोकसंख्या, जंगलांचे घटते प्रमाण आणि तिथे वाढती अतिक्रमणे यामुळे सगळीकडेच सध्या वन्यप्राण्यांनी मानवी वस्त्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यातील व्याघ्रप्रकल्पांना सध्या चहूबाजूंनी अतिक्रमणांनी वेढलेले आहे. वन्यजीव संवर्धन कायद्याची अंमलबजावणीही योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करून गेल्या दहा वर्षांत वन्यप्राण्यांच्या झालेल्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)