क्रीडांगण : पुन्हा फिक्सिंगचा धुरळा (भाग १)

नितीन कुलकर्णी 

क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत मोठा मॅच फिक्‍सिंगचा गैरव्यवहार भारत आणि दक्षिण आफ्रिका 2000 सालच्या मालिकेतून जगासमोर आला होता. या वादातून बाहेर येण्यास क्रिकेट जगाला काही वर्षे लागली. मात्र, पुन्हा आयपीएलच्या सामन्यात मॅच फिक्‍सिंगचा प्रकार उघडकीस आला. आता अल जझिरा वाहिनीने एका स्टिंग ऑपरेशनच्या आधारे 2011-12 या काळात एकूण 15 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 26 वेळेस स्पॉट फिक्‍सिंग झाले होते, असा दावा केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा लेगस्पिनर दानिश कनेरियाने स्पॉट फिक्‍सिंगमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. या सर्व आरोपांमध्ये, कबुलींमध्ये कितपत तथ्य आहे याचा सोक्षमोक्ष लावून त्याच्या तळाशी जाण्याची गरज आहे. अन्यथा नुसताच आरोपांचा धुरळा उडवत राहिल्यास त्यातून क्रिकेटविषयीची प्रतिमा डागाळत राहील. तसे होता कामा नये.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा स्पॉट फिक्‍सिंगचे प्रकरण समोर आले आहे. अल जझिरा वाहिनीने एका स्टिंग ऑपरेशनमध्ये केलेल्या दाव्यानुसार 2011-12 या काळात एकूण 15 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 26 वेळेस स्पॉट फिक्‍सिंग झाली आहे. या फिक्‍सिंगमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तानचे खेळाडू सहभागी होते. अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने अल जझिरा वाहिनीचे दावे फेटाळून लावले आहेत. क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जात नाही, असे आयसीसीने म्हटले आहे. म्हणूनच आयसीसीने वाहिनीकडून कोणतीही काटछाट न करता फुटेज मागितले आहे.

क्रीडांगण : पुन्हा फिक्सिंगचा धुरळा (भाग २)

अल जझिराच्या स्टिंग ऑपरेशनच्या डॉक्‍युमेंट्रीला “क्रिकेटस्‌ मॅच फिक्‍सर्स: द मुनावर फाइल्स’ चे नाव दिले आहे. यानुसार 2011-12 या काळात सहा कसोटी, सहा एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामन्यांत फिक्‍सिंग झाले होते, असे म्हटले आहे. आयसीसीच्या रडारवर असलेल्या सट्टेबाज अनिल मुनावरच्या म्हणण्यानुसार 15 पैकी 7 सामन्यात इंग्लंड, 5 सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि 3 सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू सामील होते. काही प्रकरणात तर सामने खेळणाऱ्या दोन्ही संघातील खेळाडूंचा फिक्‍सिंगमध्ये समावेश होता, असे सांगण्यात येत आहे.

अल जझिराच्या दाव्यानुसार 2011 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेला लॉर्डस्‌ कसोटी सामना आणि यावर्षी झालेला दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यातील केपटाऊनचा कसोटी सामना याचा देखील स्पॉट फिक्‍सिंगमध्ये समावेश आहे. डॉक्‍युमेंट्रीमध्ये 2011 विश्‍वचषकातील पाच आणि 2012 च्या टी-20 विश्‍वचषकामधील तीन सामने देखील फिक्‍स झालेले होते. 2012 मध्ये संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये इंग्लंड-पाकिस्तानदरम्यान झालेल्या तीन कसोटी सामन्यात स्पॉट फिक्‍सिंगचा देखील उल्लेख आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये बुकीने दिलेली माहिती जर खरी असेल तर ती अत्यंत धक्‍कादायक आहे. तो म्हणतो, आम्ही 60 ते 70 टक्के आंतरराष्ट्रीय सामने फिक्‍स करतो.

आम्ही केवळ जगभरातील 25 ते 30 “दिग्गज’ ग्राहकांसमवेत डिल करतो. ते प्रत्येक सामन्यातून चार ते दहा कोटी कमवतात. मुनावरने ज्या रितीने मत मांडले आहे, ते पाहता एका सामन्यातून सट्टेबाज किती कमाई करतात, याचा अंदाज येतो.  मुंबईत जन्मलेला मुनावर आता दुबईत राहतो. भारतीय पोलिसांना देखील मुनावर हवा आहे. चॅनेलच्या मते, तो 2010 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिक्‍सिंग प्रकरणात सहभागी आहे. अर्थात ही बाब आयसीसीला देखील ठावूक आहे. असे असताना स्पॉट फिक्‍सिंगचा प्रकार ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने निराधार असल्याचे म्हटले आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या मते, अल जझिरा वाहिनीवरून दिलेली माहिती मर्यादित आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर केली आहे.

हे स्टिंग आधारहिन आहे आणि या कारणामुळे खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकता येणार नाही. माजी आणि विद्यमान खेळाडूंच्या प्रामाणिकतेवर आपला पूर्ण विश्‍वास आहे. क्रिकेटचे पावित्र्य टिकवण्याबाबत खेळाडू नेहमीच गंभीर राहिले आहेत, असे इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने नमूद केले आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा सीईओ जेम्स सदरलॅंड यांनी मॅच फिक्‍सिंगचे प्रकरण नेहमीच गांभीर्याने घेतले जात असल्याचे म्हटले आहे. याचा पुरावा आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर वॉर्नर आणि स्मिथविरुद्ध कारवाई करून दिला असल्याचे म्हटले आहे. मुनावरच्या दाव्यासंदर्भात चर्चा केली असून आमचे खेळाडू कोणत्याही स्थितीत चुकीचे वागलेले असल्याचे दिसून येत नाही, असे सदरलॅंड म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)