खेळाडूंची सांधेदुखी 

डॉ. चैतन्य जोशी 

वेगवेगळ्या क्षेत्रातल्या खेळाडूंना तनदुरुस्त ठेवण्यासाठी मसाज करणे अत्यंत गरजेचे आहे. मसाज केल्यामुळे प्रकृति तंदुरूस्त राहून आपला खेळ उत्तमप्रकारे खेळून त्याचा दर्जा वाढवता येतो. खेळाडूंना मसाज करताना वेगवेगळ्या तेलाचा वापर करण्यात येत आहेत. त्यामध्ये मडीवाला तेल, मिथिल सिलीकेट, कैफर, टर्पेटाऊन, निलगिरी ही तेले चांगली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ह्या तेलांमुळे रक्त पातळ होऊन थांबलेले रक्‍त व रक्‍तप्रवाह व्यवस्थित चालण्यासमदत होते. म्हणून हि तेल वापरली जातात. या तेलाच्या मसाजमुळे स्नायूंना बळकटी येऊन त्याच्या वेदना कमी होतात. स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी रॅलिस स्प्रे सुद्धा वापरला जातो. ऍक्‍युप्रेशरमुळे सुद्धा शरीराचे अवयव व स्नायू चांगले रहातात.मुख्यत्वे खेळाडूंचे वर्गीकरण व त्यानुसार व्यायाम ठरवला जातो.

1) खांद्याचे स्नायू मोकळे करणारी स्पंदन मसाज पद्धती पोहणारे, बॅडमिंटन खेळणारे, टेबलटेनिस खेळणारे यांच्या खांद्याचे स्नायूंचा सारखा वापर असल्यामुळे व खांद्याचे जॉइंटस्‌ मोकळे होण्यासाठी स्पंदन पद्धती.या मसाजमुळे खांद्याचे विकार बरे होतात.

2) मांड्यांचे स्नायू हलके करणारी बुक्‍के मसाज पद्धत हॉकी, फेंसिंग, टायक्‍वांडी, ऍथलेटस या प्रकारचा खेळ खेळणारे जे खेळाडू असतात त्यांच्या मांड्यांच्या स्नायूंच्या हालचाली जलद गतीने होत असल्यामुळे या स्नायूंना चापट्या किंवा बुक्‍के पद्धतीचा मसाज देणे गरजेचे असते. मसाजमुळे दुःख निवारण होऊन स्नायू ताजेतवाने होतात व दुखण्याचा त्रास कमी होतो.

3) पोटऱ्या, अग्रबाहूंचे स्नायूंसाठी घर्षण मसाज टेबलटेनीसपटू, जिमनस्टिक, शूटर्स, लॉन टेनिस यांच्या पोटऱ्यांच्या आणि अग्र बाहूंच्या स्नायूचा वापर जास्त प्रमाणात होतो. या स्नायूंची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व टिकविण्यासाठी घर्षण पद्धतीचा मसाज करावा.

4) गुडघ्याच्या तसेच सांध्याचे स्नायूसाठी चक्रगती मसाज जिमनॅस्टस, लॉन टेनिस, टेबलटेनिस इ. खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना गुडघ्याचे स्नायू खूप प्रमाणात वापरावे लागतात. या स्नायूंना चक्रगती मसाज केल्याने हे स्नायू योग्य त्या ताण स्थितीत आणता येतात.

5) पाठीचा कण्यावर निडिंग अँड स्पंदन मसाज
निडिंग आणि स्पंदन पद्धतीचा मसाज हे वरदान असणारे ज्यूडो, हॉकी खेळाडू, कुस्ती खेळणारे पहिलवान, पाण्यात बुड्या मारणारे, वॉटर पोलो खेळणारे, इत्यादी खेळाडू होत. या खेळाडूंच्या पाठीच्या कण्यावर पुष्कळ ताण पडत असल्यामुळे मणकयाचे सांधे दुखतात. निडिंग आणि स्पंदन पद्धतीचा मसाज दिल्यास त्यांना ते वरदान ठरेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)