जिल्ह्यात प्लॅस्टिकबंदी नाही का?

– सागर येवले

पुणे – राज्यात प्लॅस्टिकबंदीचा “फतवा’ निघाला आणि पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. पुणे जिल्हा परिषदेकडूनही यंत्रणा कामाला लावली. मात्र, काही दिवसांतच ही यंत्रणा थंडावली आणि जिल्ह्यात प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीचे तीन-तेरा झाले. प्रत्यक्ष जिल्ह्यात पाहणी केली, तर शेतीसाठी उपयोगी प्लॅस्टिक वगळता, बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे यंत्रणा नक्की करते काय, एकही कारवाई का नाही, यंत्रणाच व्यावसायिकांना सूट देते का, असे प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जूनपासून प्लॅस्टिकबंदी आदेश अंमलबाजवणीला सुरूवात झाली. त्यानुसार जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित तालुक्‍याचे अधिकारी यांना प्लॅस्टिकबंदीबाबत गावांमध्ये जनजागृती करावी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन प्रभातफेरी काढावी तसेच ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी, जिल्हा प्लॅस्टिक मुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना दिल्या. जिल्ह्यात प्लॅस्टिकचा पुरवठा करणारे तसेच खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी आणि प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार सुरूवातीला प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली, जनजागृती आणि कारवाईला सुरुवात केली. मात्र, काही दिवसांतच ही कारवाई थंडावली. त्यामुळे व्यावसायिकांचे फावत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्लॅस्टिकबंदी अंमलबाजवणीबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी यंत्रणेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये मागील एक महिन्यात एकाही व्यापाऱ्यावर किंवा व्यावसायिकावर कारवाई झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे या अहवालानुसार जिल्ह्यात सगळे व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिक प्लॅस्टिकबंदीचे काटेकोरपणे पालन करत असल्याची “पावती’ मिळते. परंतू, जिल्ह्यात प्रत्यक्ष पाहणी केली असता, सर्रासपणे प्लॅस्टिकचा वापर होताना दिसत आहे. त्यानुसार हा अहवाल केवळ “एसी’ रूममध्ये बसून केला का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)