टाकवे बुद्रुक – आंदर मावळात भात लागवड करण्यास लगबग सुरू झाली आहे. घोणशेत गावात मावळ कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार प्रथमच चारसूत्री लागवड करण्यात आली आहे.
आंदर मावळातील शेतकऱ्यांनी उपलब्ध शेतीपंपाच्या पाण्यावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड सुरू केली आहे. घोणशेत येथील प्रगतशील शेतकरी दामु नामदेव खरमारे, तुकाराम नामदेव खरमारे, दामु सोनु लंके यांच्या शेतामध्ये कृषी अधिकारी व्ही. वाय. धेडे, मंडल कृषी अधिकारी एस. के. घावट, शेतकरी मित्र शंकर गुणाट यांच्या मार्गदर्शनाखाली तीन हेक्टर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली.
चारसूत्री भात लागवड पद्धतीने भाताच्या उत्पादनात अधिक वाढ खर्च ही कमी येतो, युरिया ब्रिकेट खोल खोचल्यामुळे जामिनीच्या पृष्ठ भागाच्या वरील तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. खर्चामध्ये 30 टक्के बचत होते. तसेच किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच भाताच्या उत्पादनात 3 ते 4 पट वाढ होते, अशी माहिती कृषी अधिकारी व्ही. वाय. धेंडे यांनी दिली.