सातारा-जावळीतील 21 कामांसाठी 1 कोटी 87 लाख

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; कोयना भूकंप पुनर्वसन निधी मंजूर

सातारा  – आमदार फंड, जिल्हा नियोजन समिती यासह राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला असतानाच त्यांनी आता कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून सातारा-जावली मतदारसंघातील 21 कामांना तब्बल 1 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे.

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी या कामांसाठी निधी मंजूर केला आहे. कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्याच्या निधी वाटपाबाबत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीस आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शंभुराज देसाई, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे आदी मान्यवर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा जावलीतील विविध विकासकामांची यादी सादर करुन यासाठी त्वरित निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार सातारा तालुक्‍यातील 5 कामांसाठी 41 लाख आणि जावली तालुक्‍यातील 16 विकासकामांना 1 कोटी 46 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

सातारा तालुक्‍यातील काळोशी पोहोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लाख), गवडी पोहोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (7 लाख), पोगरवाडी येथील रंगुबाईचीवाडी पोहोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (7 लाख), झरेवाडी पोहोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (7 लाख) आणि कुस बु. येथे सभामंडप बांधणे (10 लाख) या कामांचा समावेश आहे. जावली तालुक्‍यातील आपटी येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लाख), आपटी हात्रेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लाख), पावसेवाडी पोहोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (5 लाख), उंबरी गावाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (15 लाख), मुनावळे गावाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लाख), म्हावशी येथील पाणीपुरवठा योजनेकरिता पाइपलाइन करणे (10 लाख), आंबेघर मेसाचीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लाख), केडंबे अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे (10 लाख), कुसुंबी येथे हायस्कूल शाळा खोली बांधणे (7 लाख), नांदगणे ते पुनवडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (15 लाख), मोहाट येथे सभामंडप बांधणे (8 लाख), सावली ते म्हाते रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (15 लाख), गवडी येथील मधलीवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (5 लाख), करंडी गावाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (8 लाख), सावली येथे रस्त्याखालील वाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (3 लाख) आणि केळघर येथील महादेव मंदिर ते मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (5 लाख) ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विकासकामांमुळे मतदारसंघातील जनतेने समाधान व्यक्‍त केले
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)