कापसावरील गुलाबी बोंडअळींच्या व्यवस्थापनाचे नियोजन (भाग-१)

File photo
माणिक पांडुरंग लाखे 
विषय विशेषज्ञ ( पिक सरंक्षण)
डॉ.कौशिक एस.एस,
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
कृषि विज्ञान केंद्र दहीगाव ने.
भारतात कापसाच्या लागवडी खालील क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य हे अग्रक्रमावर आहे.महाराष्ट्रात कापूस जवळ जवळ 38 लाख हेक्‍टर क्षेत्रावर लावला जातो. त्यापैकी 95 टक्के क्षेत्र बीटी कपाशी खाली आहे.बीटी कपाशीची लागवड2002 सालापासून झाली. सुरवातीला क्राय 1जीन चा वापर केला गेला या बीटी कपाशीमुळे त्या मध्ये असलेल्या डेल्टा इंडो टॉक्‍झीन या विषारी घटकामुळे तिन्ही बोंड अळ्याचे अमेरिकन,ठिपक्‍याची, आणि गुलाबी बोंड अळ्या पासून सरंक्षण मिळाले, परंतु कालांतराने मध्ये हा जीन असलेली कपाशी गुलाबी बोंड आळीने प्रतिकार निर्माण केल्याचे अढळले त्यामुळे 2006 मध्ये कपाशी मध्ये क्राय1 आणि क्राय 2 एबी जीनचा अंतर्भाव करण्यात आला. 2014 मध्ये या बोलगार्ङ 2 कपाशी देखील गुलाबी बोंड आळीस बळी पडल्याचे निदर्शनास आले.
शास्त्रीय नाव- पेक्‍टीनोफोरा गॉसीपीला
नुकसानीचे स्वरूप
गुलाबी आळी साधारणता पेरणी नंतर 90 दिवसांनी येते, परंतु सध्य परस्थितीत या अळींचा प्रादुर्भाव पेरणीनंतर 60- 70दिवसांनी दिसून येत आहे.मादी पतंग प्रामुख्याने पात्या, फुले,कळ्या, कोवळी बोंडे यावर अंडी घालते. सुरवातीला अळ्या फुलावर जगतात त्यामुळे बोंडाची पूर्ण वाढ होत नाही व गळतात.अळ्या बोंडात शिरून आतील बिया खातात.प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमलतात त्याला डोमकाळी म्हणतात. अळीची कोषावस्था बंडात पूर्ण होते. एका बोंडात 10-15 अळ्या असू शकतात. रुईची प्रत बिघडते. बियाची उगवण कमी होते. पर्यायी खाद्य वनस्पती भेंडी, अंबाडी, मुद्रिका,जास्वंद, ताग.
जीवनक्रम अंडी (3-6दिवस) अळीं (9-14 दिवस)- कोष (8-13 दिवस) पतंग
गुलाबी बोंडअळी6 – 8 महिने निद्रस्त अवस्थेत राहतात.
प्रादुर्भाव कसा ओळखावा
हिरव्या बोंडावर तसेच उघडलेल्या बोंडावरती डाग दिसतात. कामगंध सापळ्यात नर पतंग अडकलेले आढळल्यास, डोमकाळी आढळल्यास, हिरव्या बोंडावर 1.5 ते2 मिमी व्यासाचे लहान निकास छिद्र आढळून येते.
गुलाबी अळीं येण्याची कारणे
*जास्त कालावधीच्या संकरीत जातीची लागवड कारणे.
*विविध संकरीत जातीचा फुलोरा व फळधारणेचा वेगवेगळा आणि जास्त कालावधी
*पूर्व हंगामी ( एप्रिल मे) लागवड केलेल्या कापसाचा फुलोरा जून जुलै मध्ये येणाऱ्या गुलाबी बोंडअळीं साठी उपयुक्त ठरते.
*गुलाबी बोंडअळीं क्राय1 आणि क्राय 2 या दोन्ही जनुकाप्रती प्रतिकारक्षमता निर्माण केली आहे, त्यामुळे बोलगार्ड 2 कपाशी वर प्रादुर्भाव आढळून येतो.
*वेगवेगळ्या रासायनिक औषधे वापरणे झाडातील प्रतिकारक क्षमता कमी होते.
*यजमान पिकाची वर्षभर उपलब्धता असल्याने अळीचा प्रादुर्भाव वाढतो.
*गैर बीटी कपाशी आश्रयपिक म्हणून वापर न केल्याने
*वेळेवर आणि योग्य व्यवस्थापनाचा अभाव
*मोनो क्रोटोफॉस आणि असिफेट या कीटकनाशकाच्या मिश्रणाचा वापर
*जिनिंगमिल मध्ये कापसाची जास्तकालावधी साठी साठवण
*जास्त तापमानात देखील हे कीटक तग धरून राहतात.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)