कापसावरील गुलाबी बोंडअळींच्या व्यवस्थापनाचे नियोजन (भाग-२)

File photo
माणिक पांडुरंग लाखे
विषय विशेषज्ञ ( पिक सरंक्षण)
डॉ.कौशिक एस.एस,
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
कृषि विज्ञान केंद्र दहीगाव ने.
गुलाबी बोंडअळींचे व्यवस्थापन पेरणी पूर्वी
*उन्हाळी खोल नांगरट करावी. तसेच पूर्वीच्या पिकाचे अवशेष जाळून नष्ट करावेत.
बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी.
पेरणीच्या वेळी
*पेरणी 15 मे ते 15 जून पर्यंत पूर्ण करावी, जास्तीत जास्त उशिरा पेरणी 15 जुलै पर्यंत पूर्ण करावी. जेणेकरून फुलांनी फळ धारणेच्या काळात जमिनीत पुरेसा ओलावा राहील.
*हलक्‍या व मधम जमिनीत कमी कालावधीच्या (150-180 दिवस) जातीची निवड करावी. गैर बीटी कपाशी बीज 120 ग्राम प्रती एकर आश्रयपिक म्हणून वापर करावा. तूर, सोयाबीन, मुंग, उडीद यासारखी पिके अंतर पिके म्हणून घ्यावीत.
रासायनिक खाते शिफारशी प्रमाणे द्यावीत.नत्रयुक्त खताचा जास्तीचा वापर टाळावा. खते विभागून द्यावीत.
भेंडी पिक सापळा पिक म्हणून लागवड करावी परंतु पिक ओंक्‍टबर नोव्हेंबर मध्ये फुलात येईल अश्‍या बेताने लागवड करावी. पेरणी पासून 90 दिवसापर्यंत
पिक वाढीच्या सुरवातीच्या कालावधीत शेत तणमुक्त ठेवावे.
पेरणीनंतर 30,60 दिवसांनी नीम अर्क 5 टक्के ची फवारणी करावी. पिक वाढीच्या सुरवातीच्या कालावधीत ( पेरणीपासून तीन महिने ) रासायनिक कीटक नाशकाची फवारणी टाळावी.जैविक किवा वनस्पतीजन्य औषधाचा वापर टाळावा. नियमित दर आठवड्याला किडीचे सर्व्हेक्षण करावे आणि कमी तीव्रतेची औषधे वापरावीत.
सुरवातीच्या कालावधीत कीटक नाशकाचा वापर टाळल्यास पिकाची वाढ जोमदार होण्यास मदत होते, तसेच परोपजीवी आणि परभक्षी किटकाची वाढ होऊन नैसर्गिक कीड नियंत्रण होण्यास मदत होते.
ऑगस्ट मध्ये गंध सापळे 4-5 प्रती हेक्‍टर प्रमाणे लावावेत. जर 2-4 पतंग प्रती सापळा 3 दिवस नियमित आढळून आल्यास ट्रायकोग्रामा ट्रायडेई बॅक्‍टेरी किवा ब्रॅकॉन या परोपजीवी किटकाचा 1.20 लाख कीटक प्रती हेक्‍टर प्रमाणे वापर करावा.
*डोम काळी काढून नष्ट करावी.
पेरणीनंतर 90ते 120 दिवस फुलोरा एकाच वेळी येण्यासाठी पुन्हा पुन्हा मोनोक्रोटोफॉस(मोनोसिल)+ऍसीफेट(असाटाफ) या किटक नाशकाच्या मिश्रणाचा फवारणीद्वारे वापर टाळावा.सप्टेंबर महिन्यात क्वीनालफॉस 20टक्के एएफ (एकात्मक) 20 मिली किवा थायोडीकार्ब 75टक्के डब्लूपी(लार्वीन) ग्राम प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
पेरणीनंतर 120 ते 150 दिवस- पांढरी माशी,मिलीबग्ज इत्यादी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नोव्हेंबरपूर्वी संश्‍लेशीत पायरेथ्रोईड कीटकनाशकाचा वापर टाळावा उदा. ऍसीफेट (असाटाफ) ,फिप्रोनील( रिजेंट)
ऑक्‍टोबर नोव्हेबर महिन्यात क्‍लोरोपायरीफॉस 20 ईसी (फोर्स) 25 मिली किवा थायोडीकार्ब 75टक्के डब्लूपी (लार्वीन) 20 ग्राम प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
डिसेबंर महिन्यात फेनवलरेट 20टक्के ईसी(फॅनटॉम) मिली किवा सायपरमेथ्रीन 10 टक्के ईसी (रझा) किवा स्पिनोसॅड 4 मिली (स्पिनटॉर) किवा लॅम्बडासायलोथ्रीन (वारियरप्लस) 4 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. जर पावर स्प्रेचा वापर केला तर औषधाचे प्रमाण 3 पट वाढवावे.
समूह पातळीवर करावयाचे नियोजन
*कापसाचा खोडवा घेण्याचे टाळावे
*पिक फेरपालट करून किडीच्या जीवन क्रमात अडथळा निर्मान कारणे.
*कापसाचे पिक स्वच्छ ठेवावे.
*जिनिंग मिल व परिसरात स्वच्छत ठेवावी, कापूस साठवणूक जास्त कालावधी साठी करू नये.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)