रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्याआधी मोदी सरकारकडून खुशखबर

राखी आणि मूर्तींवर जीएसटी नाही

नवी दिल्ली – रक्षाबंधन हा सण या महिन्यात तर गणेशोत्सव पुढील महिन्यात आहे. रक्षाबंधनासाठी राखीला महत्व असते.  देशात अनेकठिकाणी यानिमित्त राखीचे स्टाॅल्स लागतात. मोठ्या प्रमाणात राखीची विक्री होते. रक्षाबंधनाच्या पूर्वतयारीसाठी बाजारात राखी खरेदीसाठी गर्दी होते. जीएसटी प्रणालीमुळे अनेक वस्तूंचे भाव वाढले.  मागील वर्षी राखीचे देखील भाव वाढले होते. मात्र यावर्षी सरकारने राखीला जीएसटीतून वगळले आहे. त्यामुळे राखी खरेदी करताना ग्राहकाला जीएसटी द्यावा लागणार नाही.

त्याचबरोबर सरकारने गणेशोत्सव जवळ आल्याने सर्व प्रकारच्या मूर्ती, हस्तकलेच्या वस्तू आणि हातमागच्या वस्तूंना देखील जीएसटीमधून वेगळे ठेवले आहे. त्यामुळे रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या आधी नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

याबाबत केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, रक्षाबंधन येत आहे, आम्ही राखीवर जीएसटीची सूट दिली आहे. तसेच गणेश चतुर्थी जवळ आल्याने सर्वप्रकारच्या मूर्ती, हस्तकला आणि हातमागच्या वस्तूंना देखील जीएसटीपासून वेगळे ठेवले आहे.या सर्व वस्तू आपला वारसा आहेत आणि त्या वस्तूंना आपल्याला सन्मानपूर्वक जतन करायचे आहे.

रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थीनिमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सणांच्या काळात लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी माफ करण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)