पिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान

जम्मू – काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांना गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी पुलवामा येथील पिंगलान येथे सोमवारी पहाटे शोधमोहीम सुरु केली होती. सैन्य दलांनी हाती घेतलेल्या या शोधमोहिमेदरम्यान पकडले जाण्याच्या भीतीने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी शोध मोहिमेवर असलेल्या जवानांवर गोळीबार सुरू केला.

दहशतवाद्यांच्या या गोळीबारास सैन्यदलांकडून चोख प्रतिउत्तर देण्यात आले. सैन्यदल आणि दहशतवादी यांच्यामधील या चकमकीत ‘जैश’चा काश्मीर कमांडर आणि पाकिस्तानी नागरिक असलेला कामरान आणि हिलाल अहमद या दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्यदलांना यश आले आहे.

या चकमकीमध्ये सैन्यदलाच्या मेजर व्ही एस धोंडियल, हवलदार शेओ राम, सिपाही हरि सिंह आणि अजय कुमार यांना वीरगती प्राप्त झाली आहे.

#UPDATE on Pinglana, Pulwama encounter: One AK-47 & one pistol recovered. Identification of bodies of the two terrorists killed during encounter, yet to be confirmed. Search operation continues. #JammuAndKashmir pic.twitter.com/CGYfIctxNL

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)