महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयात हजारो लीटर पाण्याची नासाडी

पिंपरी – महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी शिवसेनेचे रहाटणी-काळेवाडी विभाग प्रमुख युवराज दाखले यांनी केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरावर पाणी कपातीचे संकट आहे. अशा परिस्थितीतीत पाणी बचतीची गरज असताना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे वायसीएम रूग्णालयात दररोज हजारो लिटर पाणी वायाला जात आहे. रुग्णालयातील पाचही मजल्यांवरील स्वच्छतागृहांमधील नळांमधून दिवसभर पाणी वायाला जात असते. अनेक ठिकाणी वाहिनीतून पाण्याची गळती होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाणी बचतीची सुरूवात महापालिकेने स्वतःपासून करणे गरजेचे असताना महापालिका मिळकतींमध्ये पाण्याचा होत असलेला अपव्याय संतापजनक आहे. महापालिका आयुक्तांनी स्वतः याप्रकरणी लक्ष घालावे. वायसीएममधील पाणी गळतीचा आढावा घ्यावा. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी. अन्यथा शिवसेना व शिवशाही व्यापारी संघ आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारेल, असे युवराज दाखले यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)