शासनाला कोट्यावधींचा महसूल देणारे ‘एक्साइज’ सुविधांमध्ये कंगाल !

अपुऱ्या मनुष्यबळामुळे अवैध विक्री जोमात; कारवाईत वाढ हवी

तळेगाव दाभाडे  – येथील कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतीतील कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. अपूर्ण मनुष्यबळ असल्याने अवैध देशी व बनावट विदेशी दारू विक्री जोमात होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 1910 साली ब्रिटिश सरकारने बांधलेली इमारतमध्ये यापूर्वी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे कर्मचारी राहत होते. कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय भाड्याच्या जागेत होते. 2015 पासून या कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू झाले. ब्रिटीश कालीन इमारत असल्याने ती नादुरुस्त आह.

दारे, खिडक्‍या मोडकळीस आलेल्या आहेत. भिंतीत उंदीर व घुसींचा वावर असल्याने भिंतीतून माती गळत असल्याने भिंती धोकादायक झाल्या. या कार्यालयाकडून दैनंदिन अवैध देशी व बनावट विदेशी दारू विक्री व साठवण करणाऱ्यावर कारवाई करून जप्त करण्यात आलेला लाखोंचा मुद्देमाल कार्यालयात परिसरात ठेवला असून, या कार्यालयाला संरक्षण कुंपण नसल्याने कार्यालयाची सुरक्षा रामभरोसे आहे.

“तळेगाव दाभाडे कार्यालयाकडून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल दिला जातो. कार्यालयाची इमारत ब्रिटिश कालीन असून, दुरवस्था झाली आहे. कार्यालयाला संरक्षक कुंपण नसल्याने कारवाईच्या मुद्देमाल उघड्यावर असून, सुरक्षा व्यवस्था नाही. वरिष्ठ कार्यालयात वरील मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे.
– राजाराम खोत,निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.

या कार्यालयाच्या हद्दीत आळंदी, चाकण व संपूर्ण मावळ तालुका आहे. एक निरीक्षण राजाराम खोत, उपनिरीक्षक राजेंद्र दिवसे व नरेंद्र होलमुखे व पाच कर्मचारी आहेत. या कार्यालयाची हद्दी खूपच अधिक असून राज्यमार्ग, महामार्ग, द्रुतगती, नगरपरिषद व औद्योगिक क्षेत्र असल्याने टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर अवैध देशी व बनावट विदेशी दारू विक्री होत आहे. परवानगी असलेली दुकाने, हॉटेल व ढाबे कमी आहेत.

उपलब्ध असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दाखल गुन्ह्याच्या तपास व साक्ष देण्यासाठी जावे लागत असल्याने अवैध देशी व बनावट विदेशी दारू विक्री व साठवण बिनधास्तपणे सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला मिळवून देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

या कार्यालयात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती करावी. सुरक्षा कुंपण उभारावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, सोमा भेगडे, आशिष खांडगे, हरीश दानवे, शरद मोरे, शरद मालपोटे
आदींनी केली.

सोमा भेगडे म्हणाले की, पुणे-मुंबई महानगराच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्‍यात सर्वाधिक देशी व विदेशी दारू विक्री ही टपऱ्या, हॉटेल व ढाब्यातून होत आहे. कार्यालय, सुरक्षा व्यवस्था व अपुरे मनुष्यबळ आदींमुळे हे कार्यालय नावालाच असून कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या कार्यालयाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)