शितो स्कायच्या चार खेळाडूंना सुवर्ण

बारामती : राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत यश मिळविणारे शितो स्काय संस्थेचे खेळाडू.

राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी झाली निवड

पिंपरी – जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे डिसेंबर 7 व 8 दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत शितो-रियो स्पोर्टस्‌ कराटे-दो इंटरनॅशनल इंडिया (शितो-स्काय) या संस्थेच्या चार खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक प्राप्त करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये 14 वर्षीय वयोगटात सिद्धेश सूर्यवंशी, तर 17 वर्षीय वयोगटात करण मिसाळ यांनी सुवर्ण पदक मिळवले तर 17 वर्षीय मुलींच्या वयोगटात गौरी पाटोळे हिने सुवर्ण पदक मिळवून 26 ते 31 डिसेंबर दरम्यान इंदोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर 19 वर्ष वयोगटातून गणेश जाधव याने सुवर्णपदक मिळवले व राष्ट्रीय शालेय स्पर्धेत स्थान मिळवले आहे. या यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे राष्ट्रीय प्रमुख प्रशिक्षक शिहान, रविंद्र सूर्यवंशी यांनी खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)