आयुक्‍त गुरुजींनी पुन्हा घेतली शाळा; आठ दिवसांत चौथ्यांदा परेड

पिंपरी – पोलिसांना नागरिकांच्या तक्रारींना वेळेत व योग्य प्रतिसाद द्यावा, यासाठी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन हे कायमच आग्रही आहेत. मात्र त्यांच्याच पोलीस दलातील पोलीस कर्मचारी मात्र नागरिकांच्या तक्रारींबाबत गंभीर नाहीत, जिथे त्वरित मदतीची गरज आहे तिथे देखील उशीरा पोहचत आहेत. अशा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पोलीस आयुक्‍त गुरुजी होऊन त्यांची शाळा घेताना दिसत आहेत. आठ दिवसांच्या चौथ्यांदा पुन्हा एकदा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयुक्‍तांनी पनिशमेंट दिली आहे. शनिवारी (दि.16) शहरातील 150 पोलीस कर्मचारी व दहा पोलीस निरीक्षकांना दोन तास आयुक्‍त कार्यालयासमोर उन्हात उभे करण्यात आले. गेल्या आठ दिवसात चौथ्यांदा अशी परेड आयुक्‍तांनी घेतली आहे.

यामध्ये तळेगाव, आळंदी, तळेगाव एमआयडीसी, दिघी पोलीस ठाणे वगळता सर्वच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यावेळी हजर होते. यामध्ये “फोन अ फ्रेन्ड’ या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या तक्रारीवरून वेळेत घटनास्थळी न पोहचल्याबद्दल ही शिक्षा देण्यात आली. मात्र नोंदवहीत या कर्मचाऱ्यांनी वेळेत पोहचल्याची नोंद केली होती. पोलीस आयुक्‍तांनी स्वतः आयुक्तालयातून याची चाचपणी केली असता कर्मचारी केवळ नोंदी वेळेत करत आहेत, मात्र बऱ्याच ठिकाणा ते पोहचत नाहीत. तसेच घटनास्थळी किमान पाच पोलीस पोहचावे असा नियम असतानाही केवळ दोन किंवा तीन कर्मचारी पोहचत असल्याचेही समोर आले. तर काही कर्मचारी हे तक्रारदाराला फोनवरूनच बोलतात.

अशा 150 कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांची आयुक्‍तांनी सकाळी साडे दहा ते दुपारी साडे बारा अशी दोन तास परेड घेतली. तर त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्यांनी त्यांच्या टीम नीट कार्यरत न करता त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले, अशा दहा पोलीस निरीक्षकांना आयुक्‍तांनी उन्हात उभे केले. या आधीही आयुक्‍तांनी तीन दिवसांपूर्वीच 90 कर्मचाऱ्यांची अशी परेड घेतली होती व त्यांना त्यांच्या कामचुकारपणाची जाणीव करुन दिली. आयुक्‍त गुरुजींच्या या शाळेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आपण शाळेतील विद्यार्थी झाल्यासारखे वाटत असून ते पुरते हैराण झाले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)