जोतिबा मंदिरात चोरट्यांचा डल्ला

पिंपरी -दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आतील चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना तळवडे येथील ज्योतिबा मंदिरामध्ये मंगळवारी (दि. 29) पहाटे घडली. नवनाथ रामचंद्र भालेकर (वय-39, रा. ज्योतिबानगर, तळवडे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे एक ते पाच वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी तळवडे येथील ज्योतिबा मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतील 750 ग्ररॅमचा चांदीचा हार आणि मुकुट असा 25 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. उपनिरीक्षक संदीप बागुल याबाबत अधिक तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)