पावणेअकरा लाखांचा अपहार

पिंपरी -मालकाच्या परस्पर गाद्यांची विक्री करून आलेले पैसे मालकाला न देता दोन कामगारांनी मिळून 10 लाख 70 हजार 53 रुपयांचा अपहार केला. सुरेश चुन्नीलाल परिहार (वय-35, रा. बेहेड कॉम्प्लेक्‍स, पौड रोड, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार देवेंद्र चेतनकुमार चौधरी (रा. गोरसीयान कतान, वंडुकाश्‍मीर, ता. शीव. जि. बाडमेर, राजस्थान), योगेश प्रल्हाद अडागळे (रा. बावधन) या कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिर्यादी सुरेश आणि अशोक माळी यांचे बावधन खुर्द येथे झेनीत आयटी पार्कच्या बाजूला भागीदारीमध्ये गादी कारखाना आहे. या कारखान्यात आरोपी कामगार म्हणून काम करतात. पोलीस उपनिरीक्षक नानाश्री वरुडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)