रुग्णांना औषध दरवाढीच्या झळा

सात ते दहा टक्‍के वाढ : मधुमेह, रक्‍तदाबाची औषधे महागली

पिंपरी – मधुमेह आणि उच्च रक्तदाब होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसें-दिवस वाढत आहे. आजार नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित औषधे घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांकडून देण्यात येतो. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या औषधांच्या किंमतीत सात ते दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याने रुग्णांना आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत.
देशभरात औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या औषधांच्या स्वरुपामध्येही बदल केल्याचे दिसून येतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेक कंपन्यांनी औषधांचे नाव तेच ठेवून आवरण व त्यातील घटक बदलले आहेत. यामध्ये उच्च रक्तदाबाच्या टेमसीन, प्रोलेमेट एएम, प्रोलमेट एस्क्‍स, इरिटेअल ट्रिओ, टेमसन सीटी या प्रकारच्या औषधांचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर मधुमेहावरील ग्लिमीसेव्ह एम, ऍफोग्लिप एम, इस्टामेट क्‍लिझियो ट्रायो अशा विविध प्रकारच्या औषधांच्या किंमती वाढल्याने आधीच आजारांने बेजार झालेल्या रुग्णांना महागाईनेही त्रस्त केले आहे.

मधुमेह हा आजार गेल्या काही वर्षात लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यत होत असल्याचे दिसत आहेत. तसेच, या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी नियमित औषधे घेतली जातात. मागील काही दिवसात औषधांच्या वाढलेल्या किंमतीवर सेवा व वस्तू कर लावून औषधांची किंमत सुमारे दहा टक्‍क्‍यांनी वाढली असल्याची माहिती अनेक विक्रेत्यांनी दिली आहे. मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या औषधे नियमित घेतल्यास रुग्णांना दरमहा अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो. मात्र, आता औषधांच्या किंमती वाढल्याने सुमारे साडेतीनशे ते चारशे रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या खिशाला कात्री लागत आहे.

मागील दहा वर्षांपासून मधुमेह असल्याने नियमित औषधे खाण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. सध्या, औषधांच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, आजाराला नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. मागील काही दिवसात औषधांच्या किमतीत वाढ झाल्याने काही प्रमाणात महागाईच्या झळा बसत असल्याचे, ज्येष्ठ नागरिक बजरंग सोनमळे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

निमा संस्थेचे सचिव डॉ. अभय तांबिले म्हणाले की, मधुमेह आजारावरील औषधांच्या किंमतींवर नियंत्रण आणण्यासाठी “ड्रग प्राईज कंट्रोल ऍक्‍ट’च्या अंतर्गत औषधे असण्याची आवश्‍यकता आहे. तसेच, मागील काही दिवसात मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मधुमेहाने आजारी असलेले रुग्ण इन्सुलिन व गोळ्या या दोन प्रकारे औषधे वापरतात. या प्रकारची औषधे महागली आहेत.

“मधुमेह रुग्णांच्या आजाराची तीव्रता जास्त असताना (स्टेज तीन व चार) देण्यात येणारी औषधे महाग झालेली आहेत. तसेच, इतर औषधांच्या किंमती स्थिर आहेत. मधुमेह या आजारांवरील औषधांना सतत मागणी असल्याने कंपन्यामध्येही मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे.
– किरण निकम, सचिव, काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)