प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान वाटप

पिंपरी -आरपीआय (ए गट) च्या वतीने भारताच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी येथील कार्यालयाजवऴ विविध क्षेत्रातील नागरिकांना संविधानाच्या प्रती वाटप करण्यात आल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजीज शेख यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील गोरगरीबांना मतदानाचा आधिकार व स्वातंत्र्य, समता, बंधुता हे मूल्य देशाला दिले आहे, म्हणून संविधान सर्वांनी वाचले पाहिजे. या उद्देशाने संविधान वाटप करण्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजीज शेख यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना संविधानाच्या प्रती वाटप करण्यात आल्या आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)