निगडीत तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी – जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना दळवीनगर निगडी येथील पीएमपीएमएल बस स्टॉप समोर मंगळवारी (दि. 22) रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली.

गणेश दत्ता लकडे (वय-19, रा. दळवीनगर, ओटास्कीम, निगडी) या तरुणाने याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार डॅनी उर्फ जाकीर पठाण (रा. ओटास्कीम, निगडी) आणि बिब्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेश आणि त्याचा मित्र दोघेजण बोलत बसले असताना त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी गणेशला मारहाण केली. तसेच आरोपी डॅनी याने लोखंडी कोयत्याने गणेश याच्या कपाळावर मारले. यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)