हरवलेल्या मुलीचा दोन तासांत शोध

पिंपरी – शाळेतून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय मुलीचा दिघी पोलिसांनी दोन तासात शोध घेत पालकांच्या स्वाधीन केले. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी घडली.

शाळेत चित्रकलेची स्पर्धा असल्यामुळे ईश्‍वरी राम भागवत ही तिच्या शाळेत गेली होती. सकाळी साडेदहा वाजता परीक्षा संपल्यानंतर ती नेहमीप्रमाणे शाळेच्या बाहेर येऊन थांबली. परंतु, आज रविवार असल्याने तिला घ्यायला बस येणार नव्हती. ईश्वरी अर्धा किलोमीटर पुढे निघून गेली. तिला रस्ता समजला नाही. त्यानंतर तिचे वडील शाळेच्या इथे आले. मात्र ईश्वरी कुठेच दिसत नव्हती. तब्बल एक तास तिचा शोध सुरू ठेवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अखेर दिघी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी वडील राम हे गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लावंड, पोलीस अधिकारी अशोक तरंगे, महिला पोलीस अधिकारी कदम यांच्यासह 12 कर्मचाऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी एकच्या सुमारास ईश्वरीला शोधण्यात यश आले. ईश्वरी साई पार्क परिसरात सापडली. ईश्वरीला पाहताच आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)