“सीएसआर’ सल्लागाराला मुदतवाढ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामाजिक बांधिलकी विभागातर्फे सामाजिक बांधिलकीविषयी (सीएसआर) विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या “सीएसआर’ सल्लागाराला पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विविध “सीएसआर ऍक्‍टिव्हीटी’ राबविण्यात येतात. हे विविध उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 18 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या सभेत मानधनावर “सीएसआर एक्‍स्पर्ट’ सल्लागार नेमण्याचा निर्णय झाला. त्याचप्रमाणे या सल्लागारासाठी 70 हजार रुपये इतके मानधन दरमहा देण्याच्या प्रस्तावाला मान्यताही देण्यात आली. या पदासाठी एमबीए सामाजिक बांधिलकी पदविका किंवा एमबीए शिक्षण पूर्ण, तसेच सामाजिक बांधिलकी विषयीचा अनुभव, अशी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली.

त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यातून आलेल्या एकूण उमेदवारांच्या अर्जामधून मुलाखतीद्वारे एम. ए. सामाजिक शास्त्र शैक्षणिक पात्रता असणाऱ्या विजय वावरे यांची नेमणूक “सीएसआर’ तज्ज्ञ सल्लागार म्हणून करण्यात आली. तात्पुरत्या स्वरूपात सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वावरे यांची नेमणूक करताना त्यांना 70 हजार एकत्रित मानधन देण्यात आले. त्यांची मुदत 10 डिसेंबर 2018 रोजी संपली आहे. त्यामुळे त्यांनाच पुन्हा या कामासाठी पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना दरमहा 70 हजार रुपये इतकेच एकत्रित मानधन देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)