रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू

पिंपरी – धावत्या रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कासारवाडी येथे शनिवारी सकाळी घडली. सूरज उत्तम मिसळे (वय-23, रा. रुपीनगर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी मिलिंद गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कोणत्या तरी रेल्वेखाली सापडून सूरज यांचा मृत्यू झाला. त्यांच्याजवळ ओळख पटेल अशी कोणतीही कागदपत्र नव्हती. फक्त 2017 मध्ये मोबाईलचे बिल भरण्याची पावती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अजमेरा कॉलनी येथील संबंधित दुकानात जाऊन पोलिसांनी माहिती घेतली असता मोबाईल क्रमांक मिळाला. त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यावर आलेल्या नातेवाइकांनी सूरज यांचा मृतदेह ओळखला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)