एल ऍड टी कंपनीचे कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात

तळेगाव युनिट :कामगारांनी पत्रकार परिषद घेऊन मांडल्या व्यथा

लोणावळा – तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील एल ऍण्ड टी या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या तसेच कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्याचा मुद्‌द्‌यावर कंपनीच्या विरोधात कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसरले आहे. सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने आणि शिवक्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन उभे करण्यात येणार असल्याची माहिती काही कामगार प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साधारण 10 ते 11 वर्षांपूर्वी तळेगाव एमआयडीसीमध्ये उभ्या राहिलेल्या एल ऍण्ड टी कंपनीच्या प्लॅटमध्ये संरक्षण खात्यातील काही यांत्रिक भागाचे उत्पादन केले होते. याठिकाणी तेव्हापासून सुमारे सव्वाशेच्या आसपास डिप्लोमा पदवी धारक महिला व पुरुष कामगार कामास आहे. मात्र या कामगारांना आजही शासकीय नियमाप्रमाणे जेमतेम किमान वेतनश्रेणीच्या आसपास वेतन दिले जाते. तसेच एवढ्या वर्षभरात आजवर एकही इनक्रिमेंट या कामगारांना दिले गेले नसल्याचा आरोप या कामगार प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत केला.

कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कामगारांनी कामगार संघटनेची स्थापना केली. मात्र त्यानंतर कंपनीने 9 कामगारांना कामावरून निलंबित केले. तसेच ज्यांच्या जागा जमिनी या कंपनीमध्ये गेल्या अशा कंत्राटात काम करणाऱ्या स्थानिक नागरिकांना ही घरी बसविण्यात आले असून, घरी बसवण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांची संख्या जवळपास 100 असल्याचा आरोप या कामगार प्रतिनिधींनी केला आहे.

वरील अडचणी बाबत येथील कामगारांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, स्थानिक आमदार बाळा भेगडे यांच्यासह सर्व पक्षातील स्थानिक नेत्यांना भेटून आपली निवेदन दिली असल्याची माहिती वार्तालापात करण्यात आली.

मात्र हे सर्व करूनही काही फरक न पडल्याने अखेर येथील कामगारांनी शिवक्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांना आवाहन करण्यात आले आहे.

लोणावळ्यातील झालेल्या या पत्रकार परिषदेला शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ऍड. विजय पाळेकर, खजिनदार रवींद्र साठे, गुलाब मराठे, राजेंद्र पवार, रोहन आहेर, कामगार प्रतिनिधी नवनाथ गायकवाड, महेंद्र शिंदे, प्रसाद कुटे, नितीन कोकाटे, महेश बिराजदार, अजिंक्‍य जमदाडे, शैलेश धुमाळ आदी उपस्थित होते.

या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता जे कामगार निलंबित करण्यात आले आहे, ते सर्व कंत्राटी कामगार आहेत. त्यांना संबंधित ठेकेदाराने निलंबित केले असून, त्यांच्याशी कंपनीचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया कंपनीचे प्रवक्‍ते केतन बोंद्रे यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)