उड्डाणपुलास उद्‌घाटनाची प्रतीक्षा

देहुरोड पुलाचे काम पूर्ण : लवकरच वाहतुकीस खुला होणार

देहुरोड  -पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर देहुरोड येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. श्रेयवाद लाटण्यासाठी उद्‌घाटन अभावी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसल्याने हा उड्‌डाणपूल वाहतुकीसाठी खुला होईल का ? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ता डॉ. शालक अग्रवाल यांनी केला आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील देहुरोड येथील आयुध निर्माणी कारखाना जवळील लोहमार्ग उड्डाणपूल ते गुरुद्वारा दरम्यान सुमारे एक कि.मी. अंतराचे उड्डाणपुलावरील काम पूर्ण झाले असून, पुलाखालील किरकोळ रंगरंगोटीचे काम बाकी आहे.उर्वरित उड्डाणपुलावरील कामे पूर्ण झाल्याने वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो, मात्र उद्‌घाटना अभावी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.

देहुरोडचा अरूंद असणाऱ्या महामार्गाचे रूंदीकरण व उड्डाण पुलासाठी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच तसेच विविध राजकीय पक्ष व देहुरोडकरांनी पाठपुरावा करीत आंदोलन उपोषण केले असताना सुमारे दोन वर्षांपूर्वी रस्त्याचे व उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. डिसेंबर अखेर उड्डाणपुलावरील काम पूर्ण झाले असतानाही अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेले नाही.

देहूरोडकर व विविध राजकीय पक्ष तसेच फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच यांच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम झाले असल्याने उद्‌घाटनाचा मुहूर्त न पाहता आणि श्रेयवाद न लाटता लवकरात लवकर खुला करण्यात यावा अन्यथा देहुरोडकरांच्या हस्ते उद्‌घाटन करून हा पूल खुला करण्यात येईल, असा इशाराही डॉ. शालक अग्रवाल यांनी दिला आहे.

“पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर देहुरोड येथील उड्डाणपुलाखालील किरकोळ रंगरंगोटीचे काम वगळता उड्डाणपुलावरील काम पूर्ण झाले असून, उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू झाल्यानंतर पुलाखालील वाहतूक कमी झाल्याने उर्वरित असलेले रंगरंगोटीचे काम त्वरीत पूर्ण करता येऊ शकते.
– संजय गांगुर्डे, कार्यकारी अधिकारी, राज्य रस्ते विकास महामंडळ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)