स्वच्छ भारतासाठी पिंपळे गुरव ते कन्याकुमारी सायकल सफर

सामाजिक संदेश : दोन तरुणांनी पार केले 1550 किमी अंतर

पिंपळे गुरव – एकूण 1550 किलोमीटरचे अंतर अवघ्या अकरा दिवसांमध्ये सायकलने पूर्ण करून “स्वच्छ भारत… हरित भारत ‘ हा संदेश देशवासियांपर्यंत पोहचण्याचे काम पिंपळे गुरव येथील दोन तरुणांनी केले आहे. माऊली जगताप व विशाल कदम या दोन तरुणांनी मजल दर मजल करत आणि सामाजिक संदेश देत पिंपळे गुरव ते कन्याकुमारी हे अंतर पूर्ण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या यात्रेविषयी सांगताना माऊली जगताप म्हणाले की, अस्वच्छतेतून अन्नातून होणारी विषबाधा, अस्वच्छतमुळे होणारे आजार बऱ्याचदा जिवावर बेततात. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता गरजेची आहे आणि हाच संदेश देत आम्ही कन्याकुमारीपर्यंतची सायकल यात्रा पूर्ण केली, दरम्यान कुठेही कानडी व तामिळ लोकांशी संवाद साधत असताना भाषा अडचण बनून मध्ये उभी ठाकली नाही. दोन्ही बाजूंनी इंग्रजी, हिंदी व चेहऱ्यावरील हावभावातून संवाद साधला जात होता. संपूर्ण प्रवासात राहुल कुटाळे यांनी आमचे व्यवस्थापन केले.

अकरा दिवसांच्या या मोहिमेत दररोज तीन टप्यात हे युवक प्रवास करीत होते. पहिला टप्पा पहाटे पाच वाजता सुरूवात केल्यानंतर चाळीस ते पन्नास किमी अंतर पार केल्यावर नाष्ट्यासाठी ते थांबत असत. त्यांची सायकल आणि ड्रेस कोड पाहून लोकही त्यांच्याजवळ कुतुहलाने गोळा होत. अशा वेळी नदी स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण व विघटन याचे महत्व ते लोकांना समजावून सांगत. त्यानंतर दुसऱ्या टप्यात जेवण घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला झाडाखाली अथवा मोकळ्या मैदानात ते लोकांशी संवाद साधत.

प्राध्यापक दिपक शेंडकर, नितिन बारणे, दयानंद शिंदे व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी या प्रवास भ्रमंतीचा नकाशा तसेच भौगोलिक परिस्थितीचा अंदाज याविषयी मार्गदर्शन केले. आमदार लक्ष्मण जगताप यांनी माऊली जगताप आणि विशाल कदम या दोघांनाही त्यांच्या कार्यालयात बोलवून अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)