मुलांवर अपेक्षांचे ओझे नको!

प्रा. लक्ष्मण ढोबळे : ओऍसिस इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन

भोसरी – मुले ही फुलांसारखी आहेत, त्यांना त्यांचे बालपण उपभोगू द्या. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादून त्यांचे बालपण हिरावू नका असे मत माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी भोसरी येथे व्यक्‍त केले. ते शाहू शिक्षण संस्था संचलित ओऍसिस इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमलेन प्रसंगी बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाच्या संचालिका ऍड. कोमल अजय साळुंखे (ढोबळे), ओऍसिस इंग्लिश मिडीयम स्कूलचे संचालक अजय साळुंखे, डॉ. अशोककुमार पगारीया, चित्रपट अभिनेते विशाल कोलते, प्रकाश पी. खंदारे, नगरसेविका यशोदा बोईनवाड, प्रभा शाह, प्रा. धनंजय भिसे, मनोज कांबळे, संजय बोरा, भीमराव गोपनारायण व मुख्याध्यापिका शरली शाबू व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.

प्रा. ढोबळे पुढे म्हणाले की, आपल्या मुलांचे संरक्षण आपण करावयाचे आहे. मुलांसमोर पालकांनी मद्यपान, गुटखा आदि व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. मुले पालकांची कृती अंगीकारत असतात. त्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये त्यांच्यावर योग्य संस्कार व्हायला पाहिजेत.

आपल्या मुलांचे मित्र परिवार पालकांना माहित पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील घराचा किराणा खरेदी करताना आपल्या मुलासाठी एक पुस्तक अवश्‍य खरेदी करत. त्या मुलाला वाचण्याची आवड लागल्याने देशाची राजघटना मसूदा तयार करू शकला. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाची आवड पाहून त्यास भेटवस्तू द्यायला हव्यात. मुलांना शाळेत वेळेवर पालकांनी सोडले पाहिजे. उशिरा येणाऱ्या मुलांना अपराधीपणाची भावना टोचत असते. त्यामुळे वर्गात त्यांचे शिक्षकाच्या शिकवण्याकडे लक्ष लागत नाही व तो हळूहळू मागे पडतो.

शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांचा, स्वातंत्र्याच्या चळवळीतील योगदानाचा इतिहास सादर केला. यामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक लक्षवेधी ठरला. सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष उल्लेखनीय कला सादर केली. सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)