न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर करावा!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड न्यायालयात "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना अॅड. सतीश गोरडे

पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनची मागणी : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात

-मराठीला सहाव्या शतकापासूनचा इतिहास : अॅड. कडूसकर

-पिंपरी-चिंचवड न्यायालयात दरवर्षी साजरा होतो पंधरवडा

पिंपरी – पिंपरी न्यायालयात पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनतर्फे “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने असोसिएशनच्या वतीने न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, माजी अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे, पिंपरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. यु. सुपेकर, वी. ए. देसाई, एन. टी. भोसले, उपाध्यक्ष योगेश थंबा, अॅड. जे. के. काळभोर, अॅड. सतीश लांडगे, अॅड. एस. टी. गायकवाड, बी. के. कांबळे आदी उपस्थित होते.

अॅड. गोरडे म्हणाले, मराठी भाषिक जगभरात पोहचली असल्याने या भाषेला जगभरात महत्त्व आहे. मराठी भाषेला सहाव्या शतकापासून इतिहास आहे. तसेच, आपल्या भाषा प्राचीन सुसंस्कृत व सर्वोच्च असल्याने मराठी भाषेला जपणे आपले कर्तव्य आहे. यामुळे, मराठी भाषेचा वापर न्यायालयीन कामकाजात केल्यास वकिल, पक्षकार व न्यायालय यांना सोईचे ठरेल.

कामकाज करणे सोपे होईल

अॅड. कडुसकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड न्यायालयात दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा कार्यक्रम घेतला जातो. मराठी भाषा आपली राज्यभाषा असल्याने प्रत्येक ठिकाणी मराठीचा वापर केला पाहिजे. न्यायालयातही जास्तीत-जास्त मराठी भाषेचा वापर केल्यास सर्वानाच कामकाज करणे सोपे होईल.

सचिव अॅड. गोरख कुंभार, महेश टेमगिरे, अॅड. केशव घोगरे, अॅड. रामचंद्र बोराटे, अॅड. पुनम राऊत,अॅड. सुजाता बिडकर, अॅड. सी. एम. माने, ऍड. कालिदास इंगळे, अॅड. अनिल शेजवाणी, अॅड. सुदाम साने आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. अॅड. अंकुश गोयल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्येने वकील व नागरीक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)