महापालिकेकडून सात हजार मुक्‍या जीवांना जीवदान

नऊ महिन्यांतील आकडेवारी : पशू वैद्यकीय विभागाची कामगिरी

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात सात हजार जखमी प्राण्यांवर उपचार करुन जीवदान दिले आहे. दिवसाला सरासरी 30 ते 35 प्राण्यांवर उपचार केले जात असल्याने शहरातील जखमी प्राण्यांचा पशू वैद्यकीय विभाग “आधार’ बनला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी शहरातील अनेक ठिकाणी कुत्री, मांजरी भटकत असल्याचे दिसून येतात. अनेकदा कित्येक ठिकाणी वाहनांच्या धडकेत जखमी झालेले प्राणी विव्हळत असताना दिसतात. तसेच, अनेक कुटुंबांमध्ये पाळीव प्राणी कुत्री, मांजर पाळले जातात. या प्राण्यांना एखादी इजा झाली अथवा आजारी पडल्यास महापालिकेचा पशू वैद्यकीय विभाग तातडीने उपचार करत आहे. या विभागात अनेक तज्ज्ञ डॉक्‍टर असल्याने उपचार व्यवस्थित होत आहेत. शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने कुत्र्यांचे वाहनांच्या धडकेत जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्राण्यांवर महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागात उपचार केले जातात. तसेच, या विभागात शस्त्रक्रियाही केल्या जातात.

शहरात पाळीव प्राण्यांवरती काम करणाऱ्या अनेक संस्था असून रस्त्यात जखमी अवस्थेत एखादा प्राणी आढळल्यास त्या संस्थाही पशू वैद्यकीय विभागात उपचार करतात. शहरातील कित्येक रस्त्यावर विव्हळत पडणारी कुत्री, मांजरे दिसतात. परंतु, अनेक नागरिकांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. मुक्‍या प्राण्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसते. आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या मुक्‍या प्राण्यांकडे आपले लक्ष नसते. कारण त्यांच्या संवेदना आपल्याला समजत नाहीत. यामुळे, जखमी प्राण्यांबाबत उपचार करण्याविषयी जनजागृती होणे आवश्‍यक आहे.

“वर्षभरात थंडी व उन्हाळ्या या दिवसात प्राणी आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. पाळीव प्राण्यांबरोबरच शहरातील अनेक संस्थांचे सदस्य रस्त्यावर जखमी अवस्थेतील भटक्‍या प्राण्यांना तसेच पक्ष्यांना उपचारासाठी घेऊन येतात. त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातात. त्यामुळे शहरातील पशूधन वाचविण्यात मोठ्‌या प्रमाणावर यश येत आहे.
– डॉ. अरुण दगडे, मुख्य पशू वैद्यकीय अधिकारी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)