महापालिकेचा उफराटा कारभार

अतिक्रमणाच्या नावाखाली खासगी मैदानावर कारवाई

पिंपरी – पिंपळे-निलख येथे खेळाची आवड जोपासण्यासाठी खासगी जागेत तयार केलेल्या क्रिकेट आणि फुटबॉल मैदानातील नेट, खांब महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कोणतीही नोटीस अथवा पूर्वसुचना न देता उखडून टाकले. दरम्यान, या कारवाईबाबत आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनीही हात वर केले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपळे-निलख येथील हेमंत साठे यांनी याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. साठे यांची पिंपळे-निलख येथे सर्व्हे क्रमांक 64 येथे स्वमालकीचा भूखंड आहे. या जागेत साठे यांनी खेळाचे मैदान विकसित केले आहे. हिरवळ लावून मैदान तयार करण्यात आले. विजेचे खांब उभे करून नेट लावून क्रिकेट आणि फुटबॉल कोचिंग ऍकॅडमी सुरू केली आहे. या मैदानात दररोज नवोदित खेळाडू खेळाचे प्रशिक्षण घेत असतात.
महापालिकेचे बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंता अनिल राऊत हे इतर अधिकाऱ्यांसमवेत मैदानात आले. त्यांच्यासमवेत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पोलीस कर्मचारीही होते. राऊत यांनी सहशहर अभियंता राजन पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई करत असल्याचे तोंडी सांगितले. क्रिकेट आणि फुटबॉलसाठी लावलेले नेट तसेच वीजेचे खांब उखडून टाकले.

या अन्यायकारक कारवाईबाबत साठे यांनी 31 डिसेंबर रोजी सहशहर अभियंता राजन पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी कार्यकारी अभियंता सतीश इंगळे आणि उपअभियंता अनिल राऊत यांना समक्ष बोलावून घेतले. कारवाई कोणाच्या आदेशावरून केली असे विचारले असता त्यांनी आयुक्तांच्या तोंडी सुचनेनुसार आणि आयुक्तांकडे आलेल्या कोणाच्या तरी तोंडी तक्रारीनुसार केल्याचे सांगितले. त्यामुळे साठे यांनी आयुक्त हर्डीकर यांचीच भेट घेतली असता त्यांनी आपण असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या स्थानिक नगरसेवकाने ही कारवाई करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप साठे यांनी केला .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)