भोसरीमध्ये रविवारी राज्यस्तरीय ‘ब्रेन ओ ब्रेन फेस्ट’ स्पर्धा

पिंपरी – ब्रेन ओ ब्रेन संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय “ब्रेन ओ ब्रेन फेस्ट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (दि. 13) भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत ही स्पर्धा होणार असून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील सुमारे एक हजार विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहेत.

ऍबॅकसचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती ब्रेन ओ ब्रेन संस्थेच्या रचना बागडीया व स्मिता जाधव यांनी दिली. या स्पर्धेमध्ये प्रत्येक वयोगटासाठी स्पर्धेचा कालावधी हा तीन मिनिटांचा राहणार आहे. या तीन मिनिटांच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त प्रश्नांची उत्तरे सोडविणारा विद्यार्थी त्या गटाचा विजेता ठरणार आहे.

बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांच्याशी संबंधित प्रश्न असणार आहेत. तसेच, ऍबॅकस स्पर्धेमुळे मुलांमध्ये गणित विषयाबाबत गोडी निर्माण होण्यास मदत होते. ऍबॅकसच्या माध्यमातून मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. या स्पर्धेत चौदा वर्षाखालील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्मिता जाधव यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)