जन्म-मृत्यू नोंदणी निविदा प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव

पिंपरी – महापालिकेने जन्म-मृत्यूचे दाखले, नोंदणीची निविदा प्रक्रिया नियमबाह्य व बेकायदेशीररित्या केली जात असल्याचा आरोप करत जाणीव संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हा ठेका महापालिकेने मर्जीतील लोकांना दिल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून ही गैरसोय थांबवण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असल्याची माहिती जाणीव संघटनेचे अध्यक्ष अशोक कापसे यांनी दिली.

महापालिकेच्या वैद्यकिय विभागामार्फत जन्म-मृत्यू नोंदीची डाटा एन्ट्री करणे, जन्म मृत्यु दाखले वितरीत करणे, नोंदीमधील दुरुस्ती करणे आदी कामांसाठी निविदा काढली होती. या संवेदनशील विषयात महापालिकेने केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करणे अपेक्षीत होते. मात्र निविदेमध्ये अनेक त्रुटी असतानाही नियमबाह्यपणे हे काम ठेकेदाराला दिले. याबाबत जाणीव संघटनेने संबंधितांवर कारवाई करण्यासाठी अनेक निवेदने दिली होती. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करु ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)