दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

तडीपारसह सराईताला अटक : खंडणी व दरोडा विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी – भोसरी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना खंडणी व दरोडा विरोधी पथकाने अटक केली असून त्यांचा दरोड्याचा डाव उधळला आहे. मंगेश शुक्राचार्य मोरे (वय-21, रा. आळंदी रोड, भोसरी), आकाश अशोक राठोड (वय-24, रा. महादेव नगर, भोसरी) व दत्ता उत्तम पवार (वय-20, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांचे साथीदार सागर वाडाने व अमित शेकापुरे हे फरार झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई नितीन खेसे यांना खबर मिळाली की, लांडेवाडी रोड येथे एका कार जवळ काही इसम हे संशयीतरित्या थांबले असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत भोसरी पोलिसांच्या सहकार्याने सापळा रचून संबंधीत इसमांची खात्री पटताच पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून तीन इसमांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळून पोलिसांनी मिरची पुड, एक कोयता, एक पालघन, लोखंडी तलवार, पाच मास्क व गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी (एमएच-12, पीक्‍यू 1813) क्रमांकाची ऍसेंट कार असा सुमारे चार लाखांचा ऐवज जप्त केला.

आरोपी हे भोसरी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी पोलीस तपासात कबूल केले. यातील मंगेश मोरे हा पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार आहे. त्याच्यावर मारहाणीचे विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच मोरे व दत्ता पवार यांच्यावर मारहाण, दहशत पसरवणे, शांती भंग करणे असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, प्रमोद कठोरे तसोच पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, राजेंद्र शिंदे, निशांत काळे, विक्रांत गायकवाड, नितीन खेसे, सुधीर डोळस, प्रवीण माने, सुमीत देवकर व समीर रासकर या पथकाने ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)