मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम पोलिसांकडून ‘हायजॅक’

पिंपरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. मात्र, आसन व्यवस्थेत महापालिकेच्या नगरसेवकांना पहिल्या तीन रागांमध्ये बसण्यास केलेला मज्जाव यामुळे सर्वच नगरसेवकांना चेहऱ्यावर उसणे हसू आणत अन्यत्र बसावे लागले. एकंदरीत हा कार्यक्रम पोलीस यंत्रणेनेच “हायजॅक’ केल्याचा अनुभव लोकप्रतिनिधींना आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 9) विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. तत्पूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटनही झाले होते. या दोन्ही सोहळ्याचे चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या इमारतीच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम असल्याने खुद्द पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे देखील आवर्जुन उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या प्रा. मोरे प्रेक्षागृहाची आसन क्षमता 1200 असून, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने भाजप नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा अंदाज होता. आणि तो ठरला देखील खरा. मात्र, प्रेक्षागृहातील तीन रांगा केवळ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी राखीव असल्याचे ऐनवेळी कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. या सूचनेच्या अंमलबजावणीसाठी तत्पर पोलीस प्रशासनाने आपले पोलीस शिपाई या आसनांवर बसवून ठेवत, नगरसेवकांना या आसनावर बसण्यास मज्जाव केला.

ऐनवेळी आसन व्यवस्थेत केलेल्या बदलांमुळे मागील आसनांवर बसलेल्या नागरिकांना उठा कसे म्हणायचे, अशी या नगरसेवकांची पंचाईत झाली. सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे यांनी या बदलाची वारंवार स्पीकर वरुन माहिती दिल्याने अखेर या नगरसेवकांना अगदी मागील आसनांचा आधार घ्यावा लागला. तर पिंपरी-चिचवड पोलीस आयुक्‍तालयाला इमारत व फर्निचर पुरविण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडूनही, पोलीस प्रशासनाकडून नगरसेवकांची झालेली उपेक्षा प्रेक्षागृहात चर्चेचा विषय ठरली. महापालिकेतील विविध गटनेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)