पिंपरी : बीआरटी मार्गात पीएमपी बसचा अपघात

पिंपरी – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथील सॅण्डविक कंपनीसमोरील बीआरटी मार्गावर धावत असलेल्या पीएमपी बसचा स्टेअरिंगचा रॉड निघाल्याने चालकाचे बसवरील नियत्रंण सुटले आणि बस दुभाजकावर धडकली.

अपघात झालेली बस ही कात्रज डेपोची असून मार्ग क्रमांक 42 साठी निघाली होती. हा अपघात रविवारी (दि. 24) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला आहे. यात, सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, बसचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, याबाबत पुणे व पिंपरी-चिंचवड या दोनही शहरातील पीएमपी कार्यालयातील अपघात विभागाला दिवसभर कुठलीही माहिती मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अपघात झालेली बस भाडेतत्त्वावर घेतलेली असून टी-484 हा गाडीचा क्रमांक आहे. पीएमपीच्या सेवेवर शहरातील नागरिक डोळे झाकून विश्‍वास ठेवतात व बसेसने प्रवास करतात. मात्र, इतकी गंभीर घटना घडली तरी पीएमपी प्रशासनाला याबाबत माहिती नाही. यावरुन नागरिकांच्या सुरक्षेबाबत पीएमपी किती उदासीन आहे. हे दिसून आले आहे.

अपघात झालेली बस ही कात्रज डेपोची असल्याने कात्रज डेपो प्रमुखांना याबाबत संपर्क केला असता, त्यांना सुद्धा याबाबत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत माहिती नव्हती. अपघात बीआरटी मार्गात झाला असल्याने बस बाहेर काढण्यास अडथळा निर्माण होत असल्याने बऱ्याच वेळापर्यंत या मार्गातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)