यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेतर्फे शनिवारी कवी संमेलन

पिंपरी -यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्था पुणेतर्फे पहिल्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त निमंत्रिताचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजता भोसरी येथील टी.एस.लॅण्डमार्क हॉल, दिघी रोड सिद्धेश्‍वर शाळेसमोर कवी संमलेनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष राजेश दिवटे, उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे पाटील व कार्याध्यक्ष अंकुश क्षीरसागर यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले.

वर्धापन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लेखक दिग्दर्शक सतीश पाटील असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे प्रदेशाध्यक्ष ऍड. कल्याण नेहरकर असणार आहेत. कार्यक्रमात ग्रामीण कथाकार बबन पोतदार, ज्येष्ठ अभिनेते सुरेश डोळस, अभिनेते अनिल थोरात, कवी अनिल सांगळे, सचिन सोन्ने, कवी वादळकर राजेंद्र सोनवणे, काव्य मित्र संस्था अध्यक्ष राजेंद्र सगर, कृती फाउंडेशन सोमनाथ पठारे, उद्योजक मिलिंद पांडे, दिपक शिंदे, राजू वडवे, प्रदीप जाधव, विजय गुजर यांची उपस्थिती असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कवी संमेलनाचे सूत्र संचालन गणेश आघाव करणार आहेत तर अध्यक्षा रुपाली अवचरे असतील. तसेच राज्यातील प्रख्यात कवी जयश्री घुले, अनिल दिक्षीत, विजय सातपुते, अरुण कांबळे, संदिप सामाले, महेंद्र गायकवाड, सुजीत कदम, राधा दिवटे, अनिल नाटेकर, सारिका माकोडे यांच्या कवितांचा रसिकांना आनंद घेता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)