प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक पोलीस दडला आहे !

प्रशांत आदरवाड : पोलीस उदय दिनानिमित्त मॉडर्नच्या विद्यार्थ्यांशी पोलीस अधिकाऱ्यांनी साधला संवाद

निगडी – समाजात वावरताना अनेकवेळा मुलींना छेडछाडीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. अशावेळी विद्यार्थ्यांनी आजूबाजूला घडणाऱ्या घटनेविषयी जागरूक राहिले पाहिजे, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सामान्य गणवेशातील एक छोटा पोलीस दडलेला आहे. अशा वेळी मुलांनी न घाबरता चुकीच्या घटनेसंदर्भात पोलीसांशी सवांद साधला पाहिजे. भयमुक्त समाजासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे मत यमुनानगर निगडी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड यांनी व्यक्‍त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘पोलीस उदय’ दिनानिमित्त यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजाची माहिती देताना ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप ओहोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मोरे, पोलीस कर्मचारी किशोर कांबळे , शिवाजी साळवे उपस्थित होते. यावेळी मॉडर्नच्या एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी यमुनानगर पोलीस चोकीला भेट दिली. पोलीस सेवेतील करिअरच्या विविध संधींची माहिती देण्यात आली. तसेच यावेळी विविध स्पर्धा परीक्षांबद्दल करायच्या तयारीची माहिती देण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्‍त आर.के.पद्मनाभन यांच्या संकल्पनेतून शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना ‘पोलीस उदय दिन’ निमित्त पोलीस कामकाजाची माहिती देण्यात आली. यामध्ये संपूर्ण कार्यालयीन कामकाजाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस सेवेत दाखल होण्यासाठी आवश्‍यक असणारी शारीरिक आणि शैक्षणिक पात्रता काय असावी? गुन्हे तपास यंत्रणा कशी काम करते? कायद्याच्या विविध तरतुदी काय आहेत? अशा अनेक प्रश्‍नांची उकल विद्यार्थ्यांना झाली.

तसेच पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी वापरत असलेल्या शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. विविध प्रकारची पिस्तुले हाताळताना एक वेगळाच आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शाळेचे शिक्षक राजीव कुटे , शिवाजी अंबिके यांनी संयोजन केले. या उपक्रमाचे प्राचार्य सतीश गवळी, संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार आणि संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे यांनी कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)