सोसायटी बैठकीत महिलेचा विनयभंग

पिंपरी – सोसायटीच्या बैठकीमध्ये वीज चोरीचा जाब विचारणाऱ्या 42 वर्षीय महिलेला शिविगाळ करत तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुजय मस्करेन्स (रा. दापोडी) असे आरोपीचे नाव. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या बैठकीमध्ये वीज चोरीकडे लक्ष वेधले. तसेच चोरी रोखण्याबाबत जाब विचारला असता आरोपीने ही बाब वैयक्‍तीक घेत महिलेसोबत भांडण केले. तसेच महिलेला सर्वांसमक्ष शिवीगाळ केली. अश्‍लिल शब्दांचा वापर करत तिचा विनयभंग केला. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)