भुमकर चौकात तरुणाला लुटले

पिंपरी – मित्रासोबत जेवणासाठी गेलेल्या तरुणाला टोळक्‍याने मारहाण करीत लुटले. ही घटना वाकड येथील भुमकर चौकात शनिवारी (दि. 10) रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी अक्षय नानासाहेब चौधरी (रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा त्याच्या दोन मित्रांसोबत भूमकर चौक येथील महा चायनिज येथे जेवणासाठी गेला होता. त्यावेळी तेथे चार अज्ञात इसम आले व त्यांनी अक्षय व त्याच्या मित्राला मारण्यास सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी त्यांनी अक्षय याच्या कानातील सोन्याची बाळी व रोख दीड हजार रुपये हिसकावून पोबारा केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)