दापोडीतील गृहप्रकल्प रद्द करण्यासाठी स्थानिक रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

पिंपरी – दापोडी येथील झोपडपट्ट्यांसाठी होत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असून नागरिकांच्या शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दापोडी येथील लिंबोरे वस्ती, सिध्दार्थ नगर, महात्मा फुले नगर, जयभीम नगर आदी ठिकाणच्या झोपडपट्टीवासियांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प राबवताना शहर सुधारणा समितीने केलेला ठराव पुर्णपणे चुकीचा असून स्थानिक रहिवाशांच्या मुलभूत अधिकारांवर अन्याय करणारा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याअंतर्गत रहिवाशांना केवळ 269 फुटाची सदनिका देण्यात येणार आहे. तसेच जय भीमनगर येथील काही भाग झोपडपट्टी म्हणून घोषित नसतानाही या भागातील मोक्‍याची जागा लक्षात घेवून महापालिकेने बिल्डरच्या सांगण्यानुसार हा परिसर झोपडपट्टी म्हणून घोषित केला आहे.

या ठिकाणी गरज नसताना पुर्नवसनाचा घाट घालण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पास विरोध असून नागरिकांची भावना ओळखून हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, विनय शिंदे, रविंद्र कांबळे, सतिश साळवे, अजय खंडागळे, राजीव काची, संजय भिंगारदिवे, गणेश विश्‍वासे आदींचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)