सांगवीत दोन टोळक्‍यांमध्ये राडा

स्कॉर्पिओची काच फोडल्याचा वाद : परस्परविरोधी गुन्हा दाखल

पिंपरी – स्कॉर्पिओ गाडीची काच फोडली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर दोन टोळक्‍यांमध्ये भांडण झाले. एकमेकांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास गणेश नगर, पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन लक्ष्मण धोत्रे (वय-32, रा. धोत्रे चाळ, गणेश नगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहीत जाधव, विशाल जाधव, जनार्दन जाधव, योगेश बनपट्टे, रुपेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांच्या स्कॉर्पिओ कार (एमएच 12/ जीआर 7558) ची आरोपींनी काच फोडली. त्याबाबत सचिन आणि त्यांचे मित्र निलेश मंगळवेढेकर आरोपींकडे विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळेची आरोपींनी बेकायदा जमाव जमवून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल विजय जाधव (वय-22, रा. भैरवनाथ नगर, पिंपळे गुरव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेश शंकर मंगळवेढेकर (वय-22), सतीश लक्ष्मण धोत्रे (वय-30), सोमनाथ मच्छिंद्र धोत्रे (वय-40), सुरज लक्ष्मण धोत्रे (वय-25), राहुल अनिल धोत्रे (वय-21), शंकर मच्छिंद्र धोत्रे (वय-32, सर्व रा. धोत्रे चाळ, गणेशनगर, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन धोत्रे याने बेकायदा जमाव जमवून विशाल जाधव व त्यांचे मित्र रोहीत जाधव, रुपेश सोनकडे यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)