महामेट्रोच्या कामाचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडीट’ करण्याची मागणी

पिंपरी – कासारवाडी येथे मेट्रोचे काम सुरु असताना पायलिंग मशिन कोसळून झालेल्या अपघाताची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करावी. महामेट्रोच्या कामाचे “सेफ्टी ऑडीट’ व “स्ट्रक्‍चरल ऑडीट’ त्रयस्थ संस्थेच्या मार्फत करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी नगरसेविका उषा वाघेरे, निकीता कदम, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रशांत सपकाळ, कुणाल थोपटे, ऋषिकेश वाघेरे, भगवान जवळकर, अलोक गायकवाड, विशाल पवार, महेश किवळे, धनंजय जगताप, प्रतिक साळुंके, सचिन मोकाशी आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, पुणे – मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे पायलिंग मशिन उलटल्यामुळे दुर्घटना घडली. याची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करावी तसेच मनपा हद्दीत सुरु असणाऱ्या महामट्रोच्या कामाचे तज्ज्ञ समिती किंवा त्रयस्त संस्थेमार्फत सेफ्टी ऑडीट आणि स्ट्रक्‍चरल ऑडीट करावे आणि त्याचा अहवाल सर्व नागरिकांसाठी प्रसिद्ध करावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शनिवारी झालेल्या अपघातास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर, ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. जोपर्यंत “सेफ्टी ऑडीट’ आणि “स्ट्रक्‍चरल ऑडीट’चा अहवाल जाहीर होत नाही, तोपर्यंत महापालिकेच्या हद्दीतील मेट्रोचे काम पुर्णपणे थांबवावे. तसेच काम सुरु असताना अशा दुर्घटना पुन्हा होवू नये म्हणून सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)