गावकऱ्यांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून टाकी बांधण्यासाठी दिली दोन गुंठे जागा

संग्रहित छायाचित्र......

पिंपरी – आजकाल जमिनीला सोन्याचा भाव आला आहे, थोड्या-थोड्या जमिनीसाठी मोठ-मोठे वाद होत असतात. परंतु केळगाव येथील दोन दानशूरांनी गावकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी दोन गुठे जमीन दिली आहे.

केळगाव (ता. खेड) येथील ग्रामस्थांना अधिक उच्चदाबाने पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत उंच टाकी बांधायची होती. त्यासाठी जागेची शोधाशोध सुरू होती. अखेर दानशूर व्यक्‍ती तथा नॅशनल चॅम्पियन पै. बबनराव वहिले व सामाजिक कार्यकर्ते संतोष वहिले यांनी डोंगरावरील दोन गुंठे जागा विना मोबदला देऊन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केळगाव ग्रामपंयतीची ग्रामसभा नुकतीच पार पडली. या ग्रामसभेत पाणी प्रश्‍नासोबत इतर प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी अतिउच्चदाबाने पिण्याचे पाणी देण्यासाठी उंच टाकी बांधायची होती. त्यासाठी जागेचा प्रश्‍न होता. मात्र, ग्रामसभेतच बबनराव वहिले, संतोष वहिले यांनी आपली दोन गुंठे जागा देण्याचे मान्य केल्याने ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले.

दरम्यान, बबनराव वहिले व संतोष वहिले यांनी दोन गुंठे जागा विना मोबदला उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच सोनाली मुंगसे, उपसरपंच मनोज मुंगसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नामदेव मुंगसे, गणेश सोनवणे, बनेश ठाकर, विठाबाई गुंड, शारदा मुंगसे, रेश्‍मा मुंगसे, संतोष गुंड, ग्रामसेविका भारती म्हेत्रे, क्‍लार्क दत्तात्रय झिरपे, मनीषा तारडे, पाणी पुरवठा कर्मचारी निलेश गायवाड, दशरथ घुंडरे, दत्तात्रय कुंभार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)