चिमुकल्यांनी जाणले पर्यावरणाचे महत्त्व, लावली आयुर्वेदिक रोपे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पुनावळे येथील प्राथमिक कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रांगणात आयुर्वेदिक रोपे लावली. सामाजिक कार्यकर्ते पै.सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि आयुर्वेद याविषयी आपुलकी वाढावी या उद्देशाने आयुर्वेदिक रोपे पुरवली आणि चिमुकल्या पर्यावरणप्रेमींसोबत वृक्षारोपण केले.

मुख्याध्यापिका विजया भोंडवे, शाळेतील शिक्षक/शिक्षिका शरद लावंड, गादेकर, पद्मजा इंगवले, मृणाल शिंदे, शिल्पा आबनावे, ननवरे, आमले, हेंबाडे, भोईर, ज्ञानेश्‍वर गुजर यांनी विशेष सहकार्य केले. मुख्याध्यापिका आणि शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांना वृक्षारोपण आणि आयुर्वेदाचे महत्त्व पटवून सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान शाळेच्या प्रांगणात अशा प्रकारचे वृक्षारोपण करण्याची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. पै. सचिन पवार यांनी या संकल्पनेस वास्तविकतेत आणत वृक्षारोपणास मदत केली. अलीकडेच झालेल्या बालिका दिनाचे औचित्य साधत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्थानिक नगरसेविका दर्शिले यांनी देखील या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

पै. सचिन पवार यांच्यासोबत समीर पांडुरंग दर्शले, यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता. पै. पवार सातत्याने वृक्षारोपण करत असतात, आजवर त्यांनी 21 हजाराहून अधिक वृक्षारोपण केले असून त्यापैकी सात हजाराहून अधिक लोकांना वृक्षभेट दिली आहे. विशेषतः चिमुकल्यांना सोबत घेऊन वृक्षारोपणाचे कार्य ते करत असतात. यावेळी देखील त्यांनी विद्यार्थ्यांना औषधी आणि आयुर्वेदिक वृक्षांची भेट देत चिमुकल्यांकडून वृक्ष जतनाचे आश्‍वासन घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)