पोलिसांकडून भापकर स्थानबद्ध

पिंपरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प, रिंगरोड, रेडझोन अशा विविध प्रलंबित प्रश्‍नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी विरोधक आंदोलन करणार होते.

परंतु, त्या अगोदरच आंदोलनाचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना त्यांच्या निवासस्थानीच स्थानबद्ध करण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या हस्ते चार वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातून पोलीस आयुक्तालय इमारत, पंतप्रधान आवास योजना आणि स्मार्ट सिटीच्या कामाचा शुभारंभ होणार होता. मात्र मुख्यमंत्री सोलापूरात असतानाच भापकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही पोलिसांची दादागिरी आणि सरकारची हुकूमशाही असल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)