ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

file photo

पिंपरी – भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर, आणखी एक वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 5) दुपारी तीनच्या सुमारास चाकण-तळेगाव चौकात घडली.

श्रीरंग भगवंत कोळेकर (वय-62, रा. थोपटवाडी, करंजविहीरे, ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्ध दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर, लालासाहेब शिवराम कोळेकर (वय-64, रा. करंजविहीरे, ता. खेड) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ट्रक चालकाविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरंग आणि लालासाहेब हे दोघे त्यांच्या दुचाकीवरुन शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास चाकण-तळेगाव चौकातून जात होते. यावेळी भरधाव ट्रकने श्रीरंग यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये श्रीरंग यांचा जागीच मृत्यू झाला. तर, नातेवाईक लालासाहेब हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चाकण पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)