‘व्हीव्हीपॅट’ मशिनचे प्रात्यक्षिक

पिंपरी : महापौर राहुल जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान मशिनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

मतदानाची मिळणार खात्री : राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी सादरीकरण

पिंपरी  – आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी “ईव्हीएम’, “व्हीव्हीपॅट मशिन’चा वापर केला जाणार आहे. व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीनद्वारे प्रत्येक मतदाराला त्याचे मत कोणाला दिले आहे, याची खात्री करता येणार आहे. या “व्हीव्हीपॅट’ मशिनचे आज (गुरुवारी) विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसमोर प्रात्यक्षिक करण्यात आले.

महापालिकेत झालेल्या प्रात्यक्षिकावेळी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी दिलीप गावडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक श्‍याम लांडे, तुषार कामठे, कॉंग्रेसचे मयुर जयस्वाल, शेकापचे भालचंद्र फुगे उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांसोबतच निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी “व्हीव्हीपीएट’ मशीन वापरली जाणार आहे. या नव्या “ईव्हीएम’मुळे मतदारांना मतदान केल्यानंतर पावती मिळणार आहे. सात सेकंद ती पावती मतदाराला पाहता येणार आहे.

शहरात मोबाईल व्हॅनद्वारे मशिनची जनजागृती केली जाणार आहे. महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते “ईव्हीएम’, “व्हीव्हीपॅट मशिन’ आणि “मोबाईल व्हॅन’चा शुभारंभ करण्यात आला. चिंचवड विधानसभा मतदार संघात उद्यापासून नागरिकांनी मशिनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असल्याचे दिलीप गावडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)