सिंहगड चढणे स्पर्धेत ‘बजाज ऑटो’ संघ विजेता

पिंपरी – औद्योगिक क्रिडा संघटना व ऍटलस कॉप्को च्या वतीने आयोजित केलेल्या सिंहगड चढणे स्पर्धेत बजाज ऑटो संघाने सांघीक विजय विजय मिळवला आहे. ही स्पर्धा रविवारी (दि.23) आतकरवाडी सिंहगड पायथा येथे आयोजित करण्यात आली होती.

बजाज ऑटो संघ 29 गुण मिळवून प्रथम तर 10 गुण मिळवून टाटा मोटर्स संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत एकूण 10 कंपनीचे 88 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे पारितोषीक वितरण ऍटलस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुधीर राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून अजय शिंगे उपस्थित होते तर ऍटलस कामगार संघटनेचे सचिव नामदेव ठोबळे उपस्थित होते. कार्यक्रममचे सुत्रसंचलन सदाशिव गोडसे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे-

18 ते 30 वयोगट :

1)प्रमोद उगले (बजाज ऑटो)
2) चेतन कोतबल (बजाज ऑटो, चाकण)
3) अमर रासकर (टाटा मोटर्स)
31 ते 40 वयोगट
1) ज्ञानेश्‍वर नागावणे (सुप्रीम इंडस्ट्रीज)
2) विश्‍वंभर भट (बजाज ऑटो, चाकण)
3) उत्तम भोसले (टाटा मोटर्स)

41 ते 50 वयोगट :

1) गणेश मोरे (बजाज ऑटो)
2) विद्याधर राणे (टाटा मोटर्स)
3) लक्षमण सुतार (सॅण्डवीक)

51 वर्षापुढील :

1) संजय निंबाळकर (बजाज ऑटो)
2) सुदर्शन आहेर (टाटा मोटर्स)
3) अरुण पोटे (टाटा मोटर्स)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)