पिंपरीचिंचवड शहरात दत्त जयंती उत्साहात साजरी

भोसरी – पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात दत्तजयंती साजरी करण्यात आली. शहरात ठिक-ठिकाणी दत्त मंदिरांमध्ये अतिशय आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. तसेच कित्येक ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे देखील आयोजन करण्यात आले होते. केवळ मंदिरामध्येच नव्हे काही कंपन्यांमध्ये देखील दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जुनी सांगवी येथील गणराज मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी केली. श्री दत्तात्रयांचा अभिषेक, पूजा, हवन अशा वेगवेगळ्या धार्मिक अनुष्ठानांसोबत मंडळाच्या वतीने दत्त भजनांनी भक्‍तिमय वातावरणाची निर्मिती केली. दत्तात्रयांच्या भक्‍तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
भोसरी येथील डायनोमर्क कंट्रोलस्‌ कंपनीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दत्तमंदिराला रंग देऊन आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्री दत्तात्रयांची विधिवत पूजा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत व संचालिका अमिता राऊत यांच्या हस्ते करण्यात आली. दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी उत्पादन बंद ठेऊन कंपनीतील सर्व मशीनरीची व परिसराची स्वच्छता करण्यात आली, असे मनुष्यबळ विभाग प्रमुख सुर्यकांत मुळे यांनी सांगितले.

दत्तजयंतीच्या पवित्र दिवशी सर्व कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने आपल्या कुटुंबासमवेत कंपनीत आलेले कामगार आपल्या कुटुंबियांना मशीन आणि उत्पादनाची माहिती देत होते. यामुळे कंपनी म्हणजे एक कुटुंब असल्याची भावना निर्माण झाल्याचे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी सांगितले.

दिवसभर भक्‍तीगीतांनी कंपनी परिसर भक्‍तिमय झाल्याचे अक्षरा राऊत यांनी सांगितले. यावेळी विभाग प्रमुख हर्षल शेळके, प्रविण बाराथे, अक्षरा राऊत, दिलीप इधाते, मोहन कृष्णन, प्रिया देशमुख, रवी भेंनकी, स्वप्निल देशपांडे, एल्लापा पौगुडवाले, जयंत राऊत, डॉमनिक स्वामी, आदींनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)